महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे “दस मे बस” पिंपरी चिंचवड मधे राबविण्यात यावी अशी क्रांतिवीर विचार मंचाची मागणी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ जूलै २०२४ पुणे महानगर पालिकेच्या परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा संचालक मंडळामध्ये समावेश आहे. पुणे महानगरपालिकेने पी. एम. पी. एम. एल. करिता ५० मिनी बसेस खरेदी करून दहा रुपये या माफक शुल्का मध्ये पी.एम.पी.एम.एल.ला चालवण्यास दिलेली आहे. या बस करिता रुपये दहा इतके कमी शुल्क आकारण्यात आले असल्यामुळे अल्प उत्पन्न गटातील प्रवाशांची चांगली सुविधा झालेली आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील पी. एम. पी. एम. एल. ला ५० मिनी बस खरेदी करून ०५ ते ०८ किलोमीटर पर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये चालविण्यात आणल्यास येथील कामगार व इतर लहान व्यवसायिकांसाठी कमी खर्चात प्रवास सुविधा उपलब्ध होईल. तरी याबाबत पुणे महानगरपालिकेकडून माहिती घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी राबवावा. अशी क्रांतिवीर विचार मंचाची मागणी केली आहे.
यावेळी क्रांतिवीर विचार मंचाचे श्री.अविनाश शिंदे, श्री. राजू आवळे, श्री. बाबासाहेब पाटोळे, श्री. माणिक पौळ, श्री. नानासाहेब कांबळे व तसेच लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे माजी अध्यक्ष श्री. संजय ससाणे हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!