आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात आज वृक्ष दिंडीचे आयोजन व वृक्षारोपण..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ जूलै २०२४ डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागामध्ये काल दि. ०५ जूलै २०२४ रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. रामा भोरखडे यांच्या सहकार्याने शाळेला विविध प्रकारची रोपे देण्यात आली. ही संस्था विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, रुग्णांना फळे वाटप, सफाई कर्मचारी डॉक्टर नर्स यांचा सन्मान अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करते. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रूपाली जाधव यांनी मुलांना वृक्षारोपणाची माहिती सांगितली. समीक्षा इसवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे निलेश पवार, अमर पवार व निलेश नलावडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणा संबंधी घोषणा फलक हातात घेऊन व घोषणा देत एच.ए. कॉलनीतून वृक्षदिंडी काढली. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी पुष्पा राऊत यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!