इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे आज श्री. संतराज महाराज पालखीचे स्वागत…

प्रतिनिधी इंदापूर दि. ११ जूलै २०२४ आज इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्री. संतराज महाराज पालखीचे स्वागत निमसाखरचे सरपंच श्री. धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच श्री. संतश्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळ्याचे स्वागत निमसाखरचे सरपंच श्री. धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांनी केले. यावेळी नंदकुमार रणशिंग, विरसिंह रणवरे, अभिजित पाटील रणवरे, बाबुराव मोरे, जयकुमार रणशिंग, विकास रणवरे, अनिल रणशिंग, रामभाऊ रणवरे, सुदर्शन रणशिंग, संतोष रणवरे, जितेंद्र धनवडे, पंढरीनाथ व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी संतराज महाराज व सोपान काका महाराज पालखीचे ग्रामस्थांनी दर्शन घेतले व तरुणांनी युवकांनी चहा आणि व मसाले दुधाचे वाटप केले. व अन्नदान ही केले. तसेच श्री. संतश्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळ्यात आमदार श्री. जगताप संजय काका हे निमसाखर ते निरवांगी हे अंतर पालखी सोहळ्यात पायी चालत गेले.





