पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि एनी फिल्म प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार..
पिंपरी चिंचवड दि.११ जुलै २०२४ जागतिक स्तरावर ॲनिमेशन, व्हीएफएक्स, मल्टीमीडिया या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहेत. एनी फिल्म प्रा. लि. ने या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि एनी फिल्म प्रा. लि. यांच्यामधील सामंजस्य करारामुळे पीसीयुच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांना ॲनिमेशन मधील उच्च दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळाली असून त्याचा फायदा घ्यावा, असे मत एनी फिल्म प्रा. लि. चे संचालक निखिल हल्ली यांनी व्यक्त केले.
पीसीयू आणि एनी फिल्म प्रा. लि. यांच्या मध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी निखिल हल्ली बोलत होते. कार्यक्रमास उद्योजक तज्ज्ञ प्रतापराव पवार, आशियाई विद्यापीठ अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल, पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक तज्ज्ञ सचिन इटकर, प्रभारी कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे तसेच प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील आणि निखिल हल्ली यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
ॲनिमेशन, व्हीएफएक्स, मल्टीमीडिया या क्षेत्रात एनी फिल्म प्रा. लि. चा मोठा वाटा आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास, वापर, उपयोग करता आला पाहिजे. येत्या काळातील ॲनिमेशन संधींचा विचार करून पीसीयू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी पीसीईटी-पीसीयू नेहमीच आग्रही असते. यादृष्टीने यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चौकट
“या सामंजस्य कराराद्वारे, एनी फिल्म प्रा. लि.चे उद्दिष्ट
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे, त्यांना जागतिक ॲनिमेशन उद्योगात उत्कृष्ट
कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्याने सुसज्ज करणे हे आहे.” – निखिल हल्ली, एनी फिल्म प्रा. लि.
“या सामंजस्य करारामुळे स्कूल ऑफ ॲनिमेशन
व्हीएफएक्स आणि मल्टीमीडिया सायन्सेस मधील बी.एसस्सी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरतील. पिंपरी चिंचवड विद्यापीठात मीडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज; एनी फिल्म प्रा. लि. ॲनिमेशन, व्हीएफएक्स, मेटाव्हर्स, आणि गेमिंग शिक्षणातील
निपुणतेसाठी ओळखले जाते, या गतिमान क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देणे हा उद्देश आहे.” – हर्षवर्धन पाटील, कुलपती, पीसीयू