एक अद्वितिय व्यक्तीमत्व शांताराम खुडे यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ जूलै २०२४ भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तात्यासाहेब उदगुडे पाटील यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्येष्ठ समाजसेवक, अण्णा हजारे यांच्यासोबत २०१० ला सूरू झालेले आंदोलन तसेच अण्णांच्या कोर कमिटी मध्ये काम करण्याची संधी यांना लाभली. त्याची सुरुवात त्यांनी पिंपरी चिंचवड शहरांमधून केली. आज संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये भ्रष्टाचार समितीची स्थापना केली आहे.
देशाची दुसरी लढाई २०१० मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत सुरू झालेला प्रवास आज २०२४ पर्यंत मोठ्या परिश्रमाने त्यांनी सूरूच ठेवला, शांताराम खुडेंची पहिली नियुक्ती पिंपरी चिंचवड शहर संघटक या पदावर झाली नंतर पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, आणि आज या प्रवासात त्यांनी “महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष” पर्यंत मोठ्या कष्टाने जिद्दीने केला. पिंपरी चिंचवड शहर तसेच महाराष्ट्र मध्ये समितीच जाळ ते पसरवत गेले. महाराष्ट्राच्या चार ही टोकाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीची समिती स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून आज जनतेची सेवा करण्याचे त्यांना भाग्य लाभले. देशाचे पंतप्रधान यांना वेळोवेळी भ्रष्टाचाराच्या संदर्भात पत्र व्यवहार केला गेला. भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये अनेक चळवळी आंदोलनात सहभागी झाले. या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका वारंवार भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आवाज उठवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचं काम खुडे यांनी आजपर्यंत सूरू ठेवले आहे.
अशा या अद्वितिय व्यक्तीमत्वाला जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा..
