भेसळयुक्त पनीर तयार करणार्या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी-दि. १० मे २०२३ भेसळयुक्त पनीर तयार करणार्या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणार्या व्यावसयीकांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार व अंमलदार तळेगाव चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरुन, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचेकडील अन्न सुरक्षा अधिकारी यांचे सह मे.महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे याठिकाणी छापा घालुन, मे. महाराष्ट्र मिल्क डेअरीचे मालक नामे १) साजीद मुस्तफा शेख वय ३२ वर्षे रा.शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव पुणे २) जावेद मुस्तफा शेख वय ३८ वर्षे रा. सदर कामगार ३) राकेश श्रीबुध्दराम सिंग वय २६ वर्षे रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं.२९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे ४) अल्ताफ हजरतद्दीन शेख वय २७ वर्षे रा. सदर ५) अभिषेककुमार योगेशबाबु यादव वय २२ वर्षे रा.सदर ६) सर्फराज शराफतउल्ला शेख वय ३५ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेवुन, त्यांचे कडुन भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४,०००/-रुपये किंमतीचे १४० लिटर ॲसेटीक ॲसीड, ६,३२० /- रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल ४,५००/- रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३,३२,५००/- रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२००/- रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४,६६,५२० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करुन, पुढील कारवाईकामी ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई मा.विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.
