महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
मदरसा हुसेनिया ग़रीब नवाज ट्रस्टच्या वतीनेमोहरम निम्मित अन्नदान..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जूलै २०२४ मुस्लिम बांधवांमध्ये साजरा होणाऱ्या मोहरम निम्मित मदरसा हुसेनिया ग़रीब नवाज ट्रस्टच्या वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भिमसृष्टी येथे अन्नदान (लांगर-ए-इमाम हुसैन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुस्लिम बंधावसह इतर समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली व उपस्थित मुस्लिम बांधवांसह उपस्थित इतर सर्वांना मोहरम निम्मित शुभेच्छा दिल्या..
यावेळी मदरसा हुसेनिया ग़रीब नवाज ट्रस्टचे अध्यक्ष नसीम शेख, इंजि. देवेंद्र तायडे फारुक कुरेशी, इरफान शेख, मौलाना शहाबाज अन्फे, समजिक कार्यकर्ते राजन नायर, शहाबुद्दीन शेख, नवशाद शेख, रफिक कुरेशी, मिरबली, लाला साहेब गायकवाड, विवेक विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.