एस. बी. पाटील महाविद्यालयात ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ जुलै २०२४ आषाढी एकदशीनिमित्त रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. बी. पाटील महाविद्यालयात ग्रंथ दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रावेत गावचे भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरीचे पुजन प्राचार्य संदीप पाटील, हभप दत्तात्रय भोंडवे, हभप प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरी संतांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्ञानोबा, तकोबांच्या गजरात, श्री विठ्ठल नाम जयघोष करत भक्तिमय वातावरणात पालखी रावेतगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाली. समारोप प्रसंगी सांस्कृतिक व पसायदानाने सांगता केली. क्रीडा शिक्षक प्रदिप कासार यांनी नियोजनात सहभाग घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.