सिकीबाई धर्मानी हायस्कुलच्या वतीने मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी…
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ जूलै २०२४ सिकीबाई धर्मानी हायस्कुलच्या वतीने काल दि. २० जूलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष श्री. रुपचंद धर्मानी व सौ शिल्पा धर्मानी उपस्थित होते. कार्यक्रमाची सूरूवात सरस्वती पूजनाने झाली. या नंतर सर्व शिक्षक वर्गाचे सन्मान करण्यात आले. या नंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेची थोडक्यात माहिती सांगितली. शाळेच्या मुख्यधापिका सौ. रेश्मा शेख, यांच्या हस्ते सर्व शिक्षक वर्गाचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी श्वेता शर्मा, शैलेजा आराध्य, वीणा शिरोळे, वैषाली सावंत, अरविंद भामरा, राणी मोरे, मालती परदेशी, आयशा असकांनी, रोहिणी अग्रवाल, वर्षा चौधरी, रोशनी कुदळे, पूजा यादव, भाग्यश्री बनकर , स्वाती साबळे, शैनाज कागडा, किरण माने असे सर्व शिक्षक उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक वर्गाचे विद्यार्थ्यांच्यावतिने पूष्प देवून सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण माने यांनी केले.