शरनपाल कौर जितू कटारिया यांच्या हस्ते शालेय जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२४चे उद्घाटन संपन्न..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ डिसेंबर २०२४ नुकत्याच बिना इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२४चे उद्घाटन भव्य दिव्य स्वरूपात शरनपाल कौर जितू कटारिया यांच्या हस्ते स्पर्धेची प्रथम लढत लावत उद्घाटन केले त्याप्रसंगी भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष मा. पाशा आत्तार, रविराज गाढवे सचिव पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंग, गणेश मांढरे, अभिषेक शिंदे, प्रियंका अचमट्टी, कारभारी गायकवाड, किरण माने, बॉक्सिंग कोच जितू कटारिया, क्रीडा संघटक सुनील साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश मांढरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अकमल खान बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे सेक्रेटरी यांनी केले व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव या स्कूलच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली म्हणून मा. आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते या विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कांबळे, वैशाली दिंडाळ, प्रायमरी मुख्याध्यापिका माया बायस, सेक्रेटरी राजेश मनाकांत, क्रीडा शिक्षक सुनील साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील साठे यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेतील विजेते खेळाडू खालील प्रमाणे १) आर्यन भारती गोल्ड मेडल २) साहिल शिंदे गोल्ड मेडल ३) आकाश कांबळे गोल्ड मेडल ४) इशप्रित कटारिया गोल्ड मेडल ५) प्रवीण पटेल ब्रांज मॅडल ६) रणवीर कटारिया ब्रांज मॅडल इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.