
२,०२,००० रु. किंमतीचे ०४ पिस्टल, ०४ काडतुसे व ०४ रिकाम्या पुंगळया तसेच १०,७५,००० रु किंमतीचे सोन्याचे व चांदीचे
दागिने व ४,८५,००० रु. किंमतीच्या ०८ मोटर सायकल जप्त असा एकुण १७,६२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ जूलै २०२४ मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अग्नि शस्त्र बाळगणाऱ्या वर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त सो डोईफाडे सो गुन्हे, पिपंरी चिचवड, मा. बाळासाहेब कोपनर सहा पोलीस आयुक्त सो गुन्हे १ पिंपरी चिचवड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम दरोडा विरोधी पथक यांनी पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांना कार्यवाही करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. काही दिवसापुर्वी पिपरी चिचवड आयुक्तालयाच्या हद्दीत मोटार सायकल वर हवेत अग्नि शस्त्र फिरवुन इन्स्टाग्राम वर रिल तयार केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांनी कपडयाचे दुकानात जावुन, अग्नि शस्त्रांचा धाक दाखवुन कपडे जबरदस्तीने चोरी केले होते. या बाबत चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असुन त्या अनुषंगाने शोध घेत असताना पोलीस
अंमलदार गणेश सावंत, आशिष बनकर व विनोद वीर यांना बातमी मिळाली की ०४ गुन्हयांमध्ये पाहिजे असलेला आरोपी सुशील ऊर्फ बारक्या भरत गोरे हा कुरुळी गाव परिसरामध्ये एका खोलीमध्ये त्याचे साथिदारासह पिस्टल सोबत बाळगुन राहत असल्याची बातमी प्राप्त झाली. त्याअनुशंगाने दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन थरारकरित्या पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना नमुद आरोपी सुशील ऊर्फ बारक्या भरत गोरे व त्याचा साथिदार अक्षय प्रभाकर कणसे यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतलेवेळी त्यांचेकडे ०२ गावठी पिस्टल, ०२ जिवंत काडतुसे व ०४ रिकाम्या पुंगळ्या मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द म्हाळुंगे पोलीस स्टेशन, पिं चि येथे गुन्हा रजिस्टर नंबर – ४४८ / २०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे. अन्वये गुन्हा रजिस्टर करुन त्यांना अटक करुन पुढील तपास सुरु केला असुन त्याचे इतर साथिदार ०२ विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा हे करत आहेत.
सदर गुन्हयचा कौशल्यपूर्वक तपास करुन आरोपी सुशील ऊर्फ बारक्या भरत गोरे याने त्याचे साथिदार नामे अक्षय प्रभाकर कणसे व ०२ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे सोबत पिंपरी चिंचवड व पुणे शहरामध्ये जबरी चोरी, घरफोडी व मारामारी सारखे अनेक गुन्हे केले असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले असुन चोरी करुन मिळविलेल्या पैश्यातुन मध्यप्रदेश येथुन गावठी पिस्टल विकत आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान एकुण २,०२,००० रु. किंमतीचे ०४ पिस्टल, ०४ काडतुसे व ०४ रिकाम्या पुंगळया तसेच १०,७५,००० रु किंमतीचे १८ तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने व ४,८५,००० रु. किंमतीच्या ०८ मोटर सायकल असा एकुण १७,६२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे कडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे.
१) खडकवासला पोलीस ठाणे गुरनं १६ / २०२४ भादवि कलम ३७९,
२) पर्वती पोलीस ठाणे गुरनं २३८ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२).
३) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२०७ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२),
४) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ४४८ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
५) भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गुरनं ५९९ / २०२४ भादवि कलम ३७९
६) हडपसर पोलीस ठाणे गुरनं १२०१ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ ( २ )
७) हडपसर पोलीस ठाणे गुरनं ३६० / २०२४ भादवि कलम ३७९
८) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६७/२०२४ भादवि कलम ३७९
९) सिहंगड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३७५ / २०२४ भारतीय दंड संहीता ४५४, ४५७, ३८०
१०) सिहंगड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३६७ / २०२४ भारतीय दंड संहीता, ४५७, ३८०, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५)
११) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं १८३ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ ( ३ ) . (४) ३०५.
१२) चिखली पोलीस ठाणे गुरनं ४२२ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३) ३३१ (४), ३०५
१३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुरनं ३८१ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) ३३१ (४), ३०५
१४) चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३९२ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४). ३५१ (२) (३), आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महा. पो. अधि. कलम ३७( १ ) ( ३ ) सह १३५
आरोपी सुशील ऊर्फ बारक्या भरत गोरे याचेविरुध्द खुन खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची तोडफोड असे २८ गुन्हे दाखल असुन तो खालील गुन्हयामध्ये फरार होता.
१) सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं १५८ / २०२४ भा.द.वि कलम ४५२, ३२४, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५) पोका ३७(१) (३) सह १३५ फौजदारी सुधारणा कायदा कलम ३, ७ प्रमाणे
२) सहकार नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १७२ / २०२४ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे
३) चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं ३९६ / २०२४ भारतीय न्याय संहिता १०९, ३५२३५१ ( २ ) प्रमाणे
४) चिखली पोलीस ठाणे गुरनं ४११ / २०२४ आर्म अॅक्ट ३ (२५) (२७), महा. पो. अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५,
फौजदारी सुधारणा कायदा कलम ३ व ७ प्रमाणे
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त पिपंरी चिचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री संदीप डोईफोडे सो पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री बाळासाहेब कोपनर सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, महेश खांडे, गणेश सावंत, आशिष बनकर, विनोद वीर, उमेश पुलगम, गणेश कोकणे, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, प्रविण माने, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे व औदुंबर रोंगे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पो हवा माळी, व पोशि हुलगे यांनी केली आहे.



