प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ ऑगस्ट २०२४ तिन दिवसांन पूर्वी दि. ३१/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वा. च्या सुमारास सागोर सुशांतो बिस्वास, वय २६ वर्षे, रा. फ्लॅट नं. ८/१/६ केशवनगर ब्लॉक सेक्टर, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड हा त्याच्या पी.सी.सी. च्या व्हेरीफिकेशनसाठी सांगवी पोलीस स्टेशन येथे आला असता, त्याने सादर केलेल्या कागदपत्राबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीचे कामकाज पाहणारे पो.ना. जितेंद्र बावस्कर / ब.नं. १७३१ यांना संशय आल्याने त्यांनी कागदपत्रातील नमूद पत्त्यावर जाऊन पडताळणी केली असता सागोर सुशांतो बिस्वास हा त्या पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच अधिक चौकशीअंती त्याने सादर केलेला जन्माचा दाखला व ट्रान्सफर सर्टिफिकेटसुध्दा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ए. टी.बी. च्या स्टाफच्या मदतीने सदर इसमाकडे आणखी चौकशी करून पुनावळे परिसरातून ०१ व पुणे कॅम्प परिसरातून ०२ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते गेल्या काही वर्षापासुन कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारतामध्ये राहण्याकरिता लागणाऱ्या वैध व्हिसाशिवाय, भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारत देशामध्ये प्रवेश करून भारतामध्ये अवैधरित्या व बेकायदेशीर राहत असल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांतील दोघांनी बनावट जन्मदाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून त्या आधारे पासपोर्ट सुध्दा काढल्याचे उघडकीस आले. म्हणून ०४ बांगलादेशी घुसखोरांविरोधात सांगवी पोलीस स्टेशन येथे गुनो. क्र. ३१५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ ( ४ ) ३३६ ( २ ) ३३६ ( ३ ). ३४० (२), ३(५) सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ ( A ) (b), १४ (B) सह पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ सह पारपत्र (भारतात प्रवेश ) नियम १९५० चे कलम ३ ( अ ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयात सांगवी पोलीसांनी खालील ०४ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.
१) सागोर सुशांतो बिस्वास, वय २६ वर्षे, रा. ग्राम दोरीशोलोई, पो. आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि.
मागुरा, विभाग खुलना, बांगलादेश,
२) देब्रोतो वोबेन बिस्वास, वय २६ वर्षे, सध्या रा. हॉटेल संदिप, साई मिलेनिअम शॉपिंग मॉल, पुनावळे, पुणे. मुळपत्ता दोरीशोलोई, पो. आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि. मागुरा, विभाग खुलना, बांगलादेश,
३) जॉनी वोबेन बिस्वास, वय २७ वर्षे, सध्या रा. हिल टॉप लिकर देशी दारू दुकानाचे वरील मजल्यावर, गार्डन वडापावचे बाजूला, ९४६, बुटी स्ट्रीट, कॅम्प, पुणे. मुळपत्ता दोरीशोलोई, पो. आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि. मागुरा, विभाग खुलना, बांगलादेश,
४) रोनी अनूप सिकदर, वय २८ वर्षे, रा. हिल टॉप लिकर देशी दारू दुकानाचे वरील मजल्यावर, गार्डन वडापावचे बाजूला, ९४६, बुटी स्ट्रीट, कॅम्प, पुणे, मुळपत्ता बाहिर नोगोर, पो. भिमपुर, जि. फरिदपुर, बांगलादेश.
सदर गुन्हयाचा पुढील तपास हे पोलीस उप निरीक्षक किरण कणसे हे करीत आहे. पो. ना. जितेंद्र बावस्कर/ब.नं. १७३१ यांच्या सतर्कतेमुळे ०४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात यश आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, परि १ श्रीमती स्वप्ना गोरे, मा. पोलीस उप आयुक्त, परि ३ तथा नियंत्रण अधिकारी, ए.टी.बी. डॉ. श्री. शिवाजी पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्री. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे व. पो. नि. महेश बनसोडे, पो.उ.नि. किरण कणसे, पो.हवा. तुषार साळुंखे / ८५४, पो.हवा. विजय मोरे / १५३५, पो.ना. जितेंद्र बावस्कर / १७३१ तसेच दहशतवाद विरोधी शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.