Uncategorized

सराईत रिक्षा चोरास अटक करुन चार चोरीच्या रिक्षा हस्तगत गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगस्ट २०२४ मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते. गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाहनचोरी गुन्हेगारांची माहीती घेत असतांना दि. ०४/०८/२०२४ रोजी पोलीस नाईक देवा राऊत यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, एक इसम चोरीची ॲटो रिक्षा घेवून ओटास्किम निगडी भागात फिरत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करुन सदर पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ ओटास्किम भागात रिक्षा चोरीचे माहीतीची खातरजमा करणेसाठी पाठविले. भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी चौक रोडवर शोध घेत असतांना TVS कंपनीची ॲटो रिक्षा नंबर MH 14 CU 0481 ही संशयित इसम सुसाट चालवित असल्याचे पोलीस पथकाचे निदर्शनास आले.
त्याचवेळी सदर इसमाला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो भरधाव वेगाने रिक्षा चालवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना सापळा लावुन पोलीस पथकाने आरोपी गणेश दत्तु सुर्यवंशी वय ३० वर्षे रा. ओटास्किम, निगडी यास अत्यंत शिताफीने रिक्षा वाहनासह ताब्यात घेतले. चौकशीमध्ये आरोपीत याने त्याचे ताब्यातील ॲटो रिक्षा MH 14 CU 0481 ही रुपीनगर परिसरातुन चोरल्याची कबुली दिली. आरोपी गणेश दत्तु सुर्यवंशी हा सराईत चोरटा असल्याने त्यास अत्यंत विश्वासात कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातुन व कोथरुड येथुन एकूण ०४ प्रवाशी वाहतुकीच्या ॲटो रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरल्याची कबुली दिली.
हस्तगत करण्यात आलेली रिक्षा वाहने-
1) MH 14 CU 0481- TVS कंपनीची ॲटो रिक्षा तिचा इंजिन नंबर OK4GC1085790 व चेसीस नंबर MD6M14CKIC4G15717
2) MH 14 HM 3017 – TVS कंपनीची ॲटो रिक्षा तिचा इंजिन क्रमांक AK4EK4202194 व चेसीस नंबर MD6M14CA3K4E00118
3) MH 12 NW 5363 – BAJAJ कंपनीची ॲटो रिक्षा तिचा इंजिन नंबर AZYWHH2211922119 व चेसीस नंबर MD2A27AY8HWH71307
4) MH 14 JS0535-TVS कंपनीची ॲटो रिक्षा तिचा इंजिन नंबर OK4ND1040532 व चेसीस नंबर MD6M14CK5D4N12055
उघडकीस आलेले गुन्हे..
१) चिखली पोस्टे गुन्हा रजि. नं. ४४५/२०२४ भारतीय न्याय संहिता ( BNS) कलम ३०३ (२) प्रमाणे
२) पिंपरी पोस्टे गुन्हा रजि. नं. ७०२ / २०२४ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ प्रमाणे
(३) कोथरुड पोस्टे पुणे शहर गुन्हा रजि. नं. २१८ / २०२४ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) या प्रमाणे
४) रिक्षा वाहन क्रमांक MH 14 JS0535 या रिक्षाचे मालकी बाबत तपास सुरु.
आरोपी गणेश दत्तु सुर्यवंशी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. सदर आरोपीत हा हॅन्डल लॉक नसलेल्या, निर्जनस्थळी पार्किंग केलेल्या प्रवाशी वाहतूकीच्या रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरी करीत होता. चोरीच्या रिक्षा अशिक्षीत लोकांना विक्री करुन पैसे कमविण्याचे प्रयत्नात असतांना त्यास गुन्हे शाखेकडून पकडण्यात आले आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी, हॅन्डल लॉक करुन पार्कंग करावीत व संशयित इसमांबाबत तात्काळ नियंत्रण कक्षाला माहीती कळवावी असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, देवा राऊत, नामदेव कापसे, अजित सानप यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!