Uncategorized
मधु ताराच्या सहकार्याने बनतात सक्षम.पाय बसवून जीवनात बनतात भक्कम..
प्रतिनिधी पूणे दि. ०६ ऑगस्ट २०२४ काल दि. ०५ रोजी रेल्वे खाली पाय गेल्याने ससून हॉस्पिटल मधून उपचार घेऊन बाहेर पडणारे मांजरी बुद्रुक भापकर मळा येथील श्री. गणेशजी गाडगे यांना मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून महावीर संस्था यांच्या माध्यमातून मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आला.
पुणे जिल्हा प्रमुख अनिलजी दांडगे यांच्या सहकार्याने व तत्परतेने मधु तारा प्रमुख नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगे यांना मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आला.
या वेळी श्री गाडगे आणि त्यांचे चिरंजीव यश गाडगे यांनी दोन्ही संस्थेचे आभार मानले.