
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी, निगडी, इंद्रायणीनगर परिसरात घेतल्या भेटीगाठी.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ मे २०२४ शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार्राथ लक्षद्वीपचे खासदार मोहंमद फैजल यांनी इंद्रायणी नगर येथे अल्पसंख्याक समाजाच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याशी निगडी ओटास्किम परिसरात संवाद साधला. यावेळी खासदार मोहंमद फैजल यांनी देशातील एकूण परिस्थिती वर युवकांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना ते म्हणाले “या लोकसभेची निवडणूक फक्त निवडणूक नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे. आणि लोकशाही वाचवण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहान त्यांनी केले. जाती धर्मात फूट घालून सत्तेत यायचे आणि बहुमताच्या जीवावर दडपशाही करत विरोधी पक्षाच्या नेत्याना निलंबित करायचे हे धोरण मोदी सरकारचे असून राजकीय सूडातून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने दोन वेळा निलंबन कार्यवाही केली गेली परंतु या देशाच्या लोकशाही आणि संविधानमुळे मोदींना माझी खासदारकी पुन्हा बहाल करावी लागली. अमोल कोल्हे हे देखील दबावापुढे झुकले नाहीत ते एकनिष्ठ राहिले असून युवकांचा आवाज म्हणून त्यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा असेही ते म्हणाले.”
यावेळी बोलताना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने वेदांत फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प गुजरातला हलवले असून यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील लाखो तरुण बेरोजगार झाले असून महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार गुजरातला पळवणाऱ्या भाजपचा बदला येथील बेरोजगार युवक या निवडणुकीत नक्कीच घेतील” असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, मुंबई प्रदेशचे सोहेलभाई सुभेदार, महिला अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, मौलाना अब्दुल गफ्फार, मौलाना अकबर, इम्तियाज शेख, रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे, रेखा मोरे, कल्पना घाडगे, ताहेरा सय्यद, नियमात शेख, अब्दुल्ला शेख, आलम खान, बंदेअली सय्यद, रेहमान सय्यद, समाधान अचलखाब, राजेश हरगुडे, समीर मुल्ला, हाजीमलंग शेख, सुफ्रान शेख, फहिम शेख, इस्लाम चाचा, दानिश अंसारी आणि इतर प्रमुख युवक पदाधिकारी उपस्थित होते.







