आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महाराष्ट्रात जातीय तेड व दंगली घडविणाचा कट रचणाऱ्या स्वंयघोषित बाबा रामगिरी यांच्याविरुद्ध पोलिस आयुक्तांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ ऑगस्ट २०२४ सामाजिक व जातीय सलोख्यात जातीय तेड निर्माण करून सुनियोजित प्रकारे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आरोपी भामट्या रामगिरी या नराधमाविरुद्ध तक्रार व निषेध पत्र मा.पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने काल देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात जातीय तेड व दंगली घडविणाचा कट रचणाऱ्या स्वंयघोषित तथाकथित पाखंडी व भोंदू बाबा रामगिरी यांच्याविरुद्ध बी.एन.एस. एस कलम १९२, १९६, १९७, २९९, ३०३, ३५३ (२), ३५६ (२), ३५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. कारवाई नाही झाल्यास लोकशाही मार्गाने पिंपरी चिंचवड शहरात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रमुख सल्लागार राजनजी नायर शहर कमिटीचे कार्याध्यक्ष हाजी गुलाम रसूल, सरचिटणीस वी. एम. कबीर, वेल्फेयर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार भाई शेख, साजिद भाई खान, खाजाभाई नदाफ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!