क्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

तालुकास्तरीय शालेय कब्बड्डी स्पर्धेत वालचंद विद्यालय कळंबच्या, १७ वर्ष वयोगटात मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने प्रथम क्रमांक पटकावला..

विशेष प्रतिनिधी कळंब दि. २३ ऑगस्ट २०२४ क्रीडा व युवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कब्बड्डी स्पर्धा २०२४- २०२५ दिनांक २० ऑगस्ट २०२४ ते २२ ऑगस्ट २०२४ रोजी पळसदेव येथे घेण्यात आलेल्या, कबड्डी स्पर्धेमध्ये वालचंद विद्यालयात जुनियर कॉलेज कळंबच्या, १७ वर्ष वयोगटात मुलींच्या व मुलांच्या दोन्ही ही संघाने प्रथम क्रमांक मिळवला. व तसेंच १९ वर्ष वयोगट मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला, त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र कदम साहेब मार्गदर्शक क्रीडा शिक्षक काळे सर, कब्बड्डीचे कोच शेख सर, ठोंबरे सर, व उपस्थित सर्व शिक्षक यांच्या वतीने सर्व संघातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष व सर्व शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!