पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, त्या आवारात सीसीटीव्ही लावा-माधव पाटील
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ ऑगस्ट २०२४ मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण फक्त आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. पण हा पुतळा दुर्दैवानं कोसळला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत याचे उद्घाटन करण्यात आले होते. महाराष्ट्राचीच काय पण भारताची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्येसुद्धा भ्रष्टाचार करायला भाजप मागेपुढे बघत नाही असेच या घटनेवरून दिसते.
तरी आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. तसेच त्या पुतळ्यांच्या आवारामध्ये सीसीटीव्ही बसवावेत आणि त्या सर्व परिसराच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना महापालिकेने कराव्यात असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. “पंतप्रधान मोदी म्हणाले होते की न खाऊंगा ना खाने दूंगा”. मग या निकृष्ट दर्जाच्या स्मारकाच्या बांधकामांमध्ये कोणी भ्रष्टाचार केला याच्या चौकशीचे आदेश खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनी द्यावेत.
येणाऱ्या विधानसभेच्या काळात काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. महामानवांच्या पुतळ्यांच्या आवारात सीसीटीव्ही लावल्याने समाजकंटकांवरती नजर ठेवली जाईल असे माधव पाटील म्हणाले.