“महिला सूरक्षा” मायलेकींसाठी भगव्यासोबत तीन कोट “आगळावेगळा उपक्रम”..
प्रतिनिधी बोपखेल दि. २७ ऑगस्ट २०२४ बदलापूरमध्ये घडलेल्या अमानुष प्रसंगातून आपल्या आवतीभवती आपल्या गावात असे प्रसंग घडू नये म्हणून त्याची सुरूवात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा बोपखेल (रामनगर, गणेशनगर) च्या माध्यमातून पिं चिं मनपा माध्यमिक विद्यालयातील मुले-मुलींसाठी “गुड टच बॅड टच” चांगला वाईट स्पर्श बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये “काळा कोट म्हणजे ॲडव्होकेट (वकिल), “खाकी कोट” म्हणजे पोलीस कर्मचारी आणि “पांढरा कोट” म्हणजे वैद्यकीय कर्मचारी या तीनही मान्यवरांना बोलवून समाजात जे वाईट प्रकार चालले आहेत तसेच गोड बोलून मुलींशी कशी जवळीक करून त्यांचा गैरफायदा घेतला जातो, समाजातील अनावश्यक प्रकार, मुलींसाठी स्व: संरक्षण, मोबाईलचा चांगला वाईट वापर, कायद्याद्वारे संरक्षण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आदिनाथ कराडसर आणि घुगे मॅडम व शिक्षक उपस्थित होते. ॲडव्होकेट प्रतिनिधी म्हणून ॲड. प्रमिला गुळवे ॲड. सारिका जाॅन, ॲड. शैलेश गायकवाड उपस्थित होते.
पोलिस प्रतिनिधी म्हणून PSI राजू भास्कर साहेब, वर्षा शिरोळे (महिला पोलिस अंमलदार), शिंगटे मॅडम महिला पोलीस, ASI दत्तात्रय कांबळे साहेब उपस्थित होते.
आरोग्य विभागातर्फे परिचारिका सौ. रूपालीताई घुले उपस्थित होत्या.
विशेष बाब म्हणजे आचल जिनवाल गुरू हे ही कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामस्थांपैकी श्री. एकनाथ घुले, श्री. नारायण घुले, श्री. जयवंत घुले, श्री. मारुती मोरे, श्री. दत्तात्रय घुले, श्री. प्रल्हाद घुले, श्री. दिनेश लोंढे, कु. पांडुरंग वहिले, कु. रोहित देवघरकर, कु. विशाल भोसले उपस्थित होते.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे प्रतिक्षाताई घुले (जिल्हा प्रमुख, युवतीसेना), जन्नतताई सय्यद (दापोडी), अमोलशेठ देवकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. भाग्यदेव घुले (युवानेते, शिवसेना), श्री संतोष गायकवाड (शाखाप्रमुख, शिवसेना बोपखेल) यांनी केले.