अभिवादनमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीद्वारे आयोजित पोंडीविटे बुद्ध लेणी व चैत्यभूमी दादर ही धम्म सहल यशस्वीरित्या संपन्न..

एक पाऊल पुढे लेणी संवर्धनाकडे..

प्रतिनिधी पिंपरी चिंचववड दि. २३ ऑक्टोंबर २०२४ दोन दावसांपूर्वी रविवार २० ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी पिंपरी येथून निघालेल्या धम्म सहलीचे सर्व सदस्यांनी भीमसृष्टीतील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादन करून कोंडीविटे बुद्ध लेणी अंधेरी कडे जात असताना प्रथम बस मध्ये बुद्ध वंदना घेण्यात आली व भीम बुद्ध गीते गात पुढचा प्रवास सुरू असताना अचानक या बसला एका कारचे नियंत्रण सुटल्याने मागून धडक दिल्यामुळे तेथे १ तासाचा वेळ वाया गेला त्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला मजल दरमजल करत भीम गीतांचा अस्वाद घेत थेट अंधेरी बुद्ध लेणी या ठिकाणी सर्व पोहोचल्यानंतर प्रथम जेवणाचा बेत आखला कारण वेळ खूपच झाला होता. मग जेवनाचा अस्वाद घेवून लेणीतील मुख्य चैत्यगृहामध्ये सर्व सदस्य जमल्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना व या लेण्यांची माहिती राजू भालेराव यांनी सर्वांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीताताई भंडारे यांनी केले.
व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सिद्धार्थ वाघमारे यांची निवड करण्यात आली.
बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर लेणी प्रेमी सुजाताई नवघरे यांनी या बुद्ध लेण्यांमध्ये सतत का आले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. निर्मलाआई माने यांनी महिलांनीही पुरुषांच्या बरोबर जास्त संख्येने या लेण्यांमध्ये आले पाहिजे तसेच या कोंडीविटे बुद्ध लेणीचे नाव महाकाली कसे करण्यात आले या विषयी मार्गदर्शन केले.
राजू भालेराव यांनी या लेण्यांविषयी सर्व माहिती उपस्थिताना समजावून सांगितली.
एक जूट लेणी प्रचार प्रसार समूहाचे अध्यक्ष दादुस डोळस यांनी या लेण्यांमधील अतिक्रमणांविषयी थोडक्यात माहिती दिली.
बोधिसत्व यूट्यूबचॅनलचे संचालक पूर्ण भारत भ्रमंती केलेले इतिहास प्रेमी सागर कांबळे यांनी लेण्यांच्या संवर्धनासाठी सर्व लेणी संवर्धक टीम तसेच धार्मिक संघटना बुद्ध विहार समित्या त्यांनी एकत्र येऊन काम करून हा पूर्ण भारतीयांचा वारसा कशाप्रकारे संवर्धित करता येईल त्याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
या कोंडीविटे बुद्ध लेणीतील एकमेव शिलालेखाचे वाचन लेणी प्रेमी सुरज सोनकांबळे यांनी केले व या लिपी विषयी व या लेण्यांची थोडक्यात माहिती सांगितली.
या शिलालेखाची माहिती मराठीमध्ये व या लेण्यांची माहिती लेणी प्रेमी इतिहास प्रेमी बोधिसत्व चॅनल सहाय्यक मनोज गजभार यांनी समजावून सांगितली कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सिद्धार्थ वाघमारे यांनी जास्त संख्येने सहपरिवारासोबत व नातेवाईक मित्र-मैत्रिणी यांना घेऊन लेण्यांमध्ये सतत आले पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.
कोंडीविटे ही बुद्ध लेणी पाहिल्यानंतर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्थळ चैत्यभूमी दादर या ठिकाणी सर्व सदस्यांनी जाऊन अभिवादन केले.
या धम्म सहलीस पिंपरी चिंचवड पुणे पनवेल कल्याण मुंबई या ठिकाणाहून अंदाजे १०० सदस्य उपस्थित होत.
ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी रवी कांबळे, राम भंडारे, महायान मसुरे राहुल कांबळे, ॲड अशोक बडेकर, रितेश वाघमारे, प्रकाश ओव्हळ, सिद्धार्थ ओव्हाळ, यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!