धनगर समाजाच्या वतीने राहुल मदनेंनी चिंचवड विधानसभा लढवावी..
प्रतिनिधी चिंचवड विधानसभा दि. २७ सप्टेंबर २०२४ राहुल निवृत्ती मदने हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. याचप्रमाणे ते मल्हार आर्मीचे पूणे जिल्हा अध्यक्षही आहेत.
यांनी तळागाळातिल प्रत्येक समाजातील बांधवांन पर्यंत त्याच्या सेवेचा झंझावात कामाच्या व मदतीच्या माध्यमातून पोहचवला आहे. याचमूळे त्यांच्या मागे ड्रायव्हर बंधू असो की मोलमजुरी करणारे बांधव भगीनी असो सदैव राहुल मदनेंच्या मागे उभे आहेत.
म्हणूनच मागिल लोकसभेच्या निवडनूकी वेळी अपक्ष उमेदवारी असताना या सर्वानी सहकार्याची भूमिका दाखवली ३० व्या नंबरला नाव असताना ही २२८२ मते पडली त्या वेळी वेळ ही खूप कमी भेटल्याचे मदनेंनी आमच्या प्रतिनिधिंशी बोलताना सांगीतले होते.
हिच त्यांच्या कामाची पावती होती. याच वेळी समस्त धनगर समाजला एका छताखाली घेऊन पुढे जायची ही भूमिका राहुल मदने यांचीच होती.
मागिल वेळी लोकसभेला जसा धनगर समाज राहुल मदनेंच्या सोबत होता तसाच या ही वेळी म्हणजे चिंचवड विधानसभेला देखिल सोबत असणार असल्याचे समाज बांधवांकडून समजते.
या वेळी त्यांनी विधानसभे आधीच घोंगडी बैठक, कोपरा बैठकी घेऊन सर्व समाजाची बांधणी एक जुट केली आहे. राहुल मदने हे लवकरच उमेदवारी अर्ज भरानार असल्याचे सांगीतले जाते.