
एकुण उमेदवारी अर्ज संख्या- ९२, एकुण व्यक्ती संख्या-४९
प्रतिनिधी मावळ लोकसभा दि. २० एप्रिल २०२४ मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २० एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 10 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २२ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आजपर्यंत एकुण ४९ व्यक्तींनी एकुण ९२ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :-
श्रीरंग चंदू बारणे (थेरगाव, शिवसेना), सुहास मनोहर राणे (लोणावळा,अपक्ष), शेखर पांडुरंग चंदनशिवे (पिंपरी , राष्ट्रवादी युवक कॉग्रेस), ॲड. राजू पाटील (वाकड , अपक्ष), ॲड. पूजा कलाटे (वाकड , अपक्ष), विजय निवृत्ती वाघमारे (वाकड, बहुजन समाज पार्टी), सागर तुकाराम जगताप (पिंपळे सौदागर, बहुजन समाज पार्टी), भाऊ रामचंद्र अडागळे (निगडी, महाराष्ट्र मजुर पक्ष), किशोर वसंत साळवे (गणेश नगर, अपक्ष), उत्तम संभाजी कांबळे (पिंपरी, अपक्ष) तसेच शिवाजी किसन जाधव (थेरगाव, भारत राष्ट्र समिती) यांनी देखील नामनिर्देशन पत्र नेले आहे.
अशी माध्यम समन्वयक
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ३३-मावळ लोकसभा मतदारसंघ यांनी आमच्या प्रतिनिधिस ही माहिती दिली.



