भेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशोध इतिहासाचा..सामाजिक

बुद्ध लेण्या मुक्त आंदोलन समिती आयोजित बेडसे बुद्ध लेणी धम्म सहल यशस्विरीत्या संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ ऑगस्ट २०२५ रविवार दि.१७/०८/२०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या नावांचा जयघोष करत. बेडसे बुद्ध लेणीमार्गावर प्रवास सुरू झाला. लेणीच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर तेथील नवीन होत असलेल्या विहारामध्ये बुद्ध वंदना गाथा पठण घेण्यात आले.
राजूभाऊ भालेराव यांच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा / फोटो विहारास भेट देण्यात आला. बेडसे बुद्ध लेणी मध्ये पोहोचल्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना लेणी प्रेमी मा. संगिताताई भंडारे यांनी केली. व सूत्रसंचालन पाली भाषा अभ्यासक विविध लिप्यांचे अभ्यासक इतिहास प्रेमी. मा. राजूभाऊ भालेराव यांनी केले व लेणीची थोडक्यात माहिती दिली.
लेणी प्रेमी मा. रवि कांबळे यांनी लेणी संवर्धनाविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले यात लेणी वर सह कुटुंब सहभाग वाढविला पाहीजे पाली भाषा अभ्यासक व विविध लिप्यांच्या अभ्यासक इतिहास प्रेमी प्रा. सुजाताताई नवघरे-मसुरे, लेणी पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष जाणली पाहीजे पाली भाषा अभ्यासाक मा. नंदुभाऊ निकम, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दैनंदिन व्यस्त असताना ही लेणी पाहण्यासाठी जात होते संदर्भ 27.12. 27ला मनुस्मृती दहना नंतर भेट दिली मा.जयश्री भिगावडे -केंद्रीय शिक्षिका-भारतीय बौध्द महासभा, लेणीवर धम्मसहल, कार्यशाळा / अभ्यास दौरे सतत आयोजित केले पाहिजे व महिला भगिनींनी त्यामध्ये मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मा.मनोज गजभार लेणी प्रेमी यांनी यावेळी सांगीतले, राजकीय आश्रय व राजकीय पाठिंबा लेणी संवर्धन साठी महत्वाचे आहे मा.अनिता सावळे, प्रदेश सचिव -वंचित बहुजन आघाडी. संघमित्रा महिला लेणी संवर्धन समुह सचिव तसेच वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मा.कुसुम वाघमारे यांनी महिलांनी सह कुटुंब लेणी पाहण्यासाठी आले पाहीजे व लेणीमध्ये नियमित उत्सव साजरे झाले पाहीजेत असे त्यांनी त्यांच्या मनोगतात विचार मांडले.
बुध्दीस्ट कला ही लेण्यांमध्ये पाहता येते मा. देवीदास ब्रम्हे बुध्दिस्ट आर्ट आणि वास्तुशास्त्रचे विद्यार्थी,
राजनंदनी खैरे, प्रिया शेख, मास्टर शेख यांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहीर दत्ता मरळीकर यांनी लेणी विषयी अवघ्या १० मिनिटांमध्ये गाणे लिहून सुंदर अप्रतिम अशी शायरी सादर केली, मा. दत्ताभाऊ ठाणांबीर यांनी पहिल्यांदाच लेणीमध्ये आल्यानंतरचा अनुभव सांगितला. स्थानिक कर्मचारी दहीभाते यांनी लेणीचे वेगळेपण सांगितले.
मा. सागर कांबळे, बोधीसत्व चॅनल संचालक यांनी स्तूपाच्या निर्मिती विषयी सुंदर अशी माहिती सांगितली.
सामाजिक कार्यकर्त्या व लेणी प्रेमी मा. मंदाकिनीताई गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या धम्म सहलीस पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १०० हून अधिक उपासक/ उपासिका व लेणीप्रेमी उपस्थित होते. ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी महायान मसुरे, राम भंडारे, सुरेश वाघमारे, रोहिणीताई लादे, उमा कांबळे मावशी, राहुल बनसोडे, सुरज सोनकांबळे, राजू सरतापे‌ यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!