आपत्कालमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

चेंबूर – वडाळा दरम्यान मोनोरेल अडकली!पावसाने पूर्णत: मूंबइची वाहतूक थांबवली..

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि २० ऑगस्ट २०२५ पावसाच्या दणक्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होणं हे मुंबईकरांच्या अंगवळणी पडलेले असतानाच यात मोनोरेलची काल भर पडली. तांत्रिक बिघाड झाल्याने चेंबूर-वडाळा या दरम्यानची मोनोरेल मध्येच अडकली. हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्यानंतर तब्बल चार तासांनंतर मोनेरेल प्रशासनाला यश आल्यानंतर रखडलेली मोनोरेल वडाळ्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.
काल सायांकाळी सहाच्या सुमारास चेंबूर येथील भक्ती पार्कजवळ आलेली एक मोनो रेल तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने ती अडकली. ही रेल्वे ओढून आणण्यासाठी दुसरी मोनोरेल पाठविण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणखी दोन तासांचा अवधी लागेल, अशी माहिती मोनोरेल प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. भक्ती पार्क स्थानकाजवळ लाल आणि हिरव्या रंगाची मोनो रेल्वे समोरासमोर अडकून पडल्या. सुरूवातीला दोन्ही मोनोरेलना या अवस्थेत पाहून त्यांच्यात धडक झाल्याची अफवा काही वेळांसाठी पसरली होती. मात्र, मोनोरेलची धडक झाली नसून तांत्रिक कारणामुळे या मोनोरेल अडकल्या आहेत, हे स्पष्ट झाले.
रविवारी मध्यरात्री चेंबूर स्थानकानजवळ टायर फुटल्याने हिरव्या रंगाची मोनो रेल्वे अडकली होती. बिघाड दुरूस्त झाल्यानंतर ही मोनोरेल यार्डात परतत होती. मात्र, भक्ती पार्क स्थानकाजवळ या मोनोरेलमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडली.
अग्निशामक दल व पोलीस, एब्युलेन्स या यंत्रणेच्या माध्यमातून मदतकार्य करून सीडी व ट्रॉली च्या साहाय्याने प्रवाशी बाहेर काढण्यात आले. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. आता असा प्रश्न उपस्थित होतो जर अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून मोनोरेल बनवली गेली तर मग हे तंत्रज्ञान फेल नाही का ? की २०००च्या नोटेतील चिप प्रमाणे हे ही विकसित तंत्रज्ञान होते का ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!