प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ नोव्हेंबर २०२४ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा निगडी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून शेकडो दिवे लावून दीपोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधवांना दीपावलीच्या निमित्त शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज समन्वयक प्रमुख डी. पी. खंडाळे, सकल मातंग समाज पूणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतदादा लोंढे, पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीचे सन्माननीय मा. अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, राजू चव्हाण, मा. अध्यक्ष रामदासभाऊ कांबळे, शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, शिवशाही बँड कलाकार आघाडी प्रदेशाध्यक्ष आदरणीय नंदु कारके, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.