एक्स सर्विस मैन वेटरन्स वेलफेअर एसोशियनच्या वतिने विरसैनिकांच्या स्मृतिदिना निमित्त दिवाळीचा एक दिवा सैनिकांच्या नावाने हमारा तिरंगा स्मारक ठाणे येथे संपन्न…
प्रतीनीधी सतिश पाटील मुलुंड दि. ०२ ऑक्टोबर २०२४ ठाणे माजीवडा सर्कल येथे आज विरसैनिकांच्या स्मृतिदिना निमित्त दिवाळीचा एक दिवा सैनिकांच्या नावाने हमारा तिरंगा स्मारक “Thane City Statue of martyrs ” एक दिया वीर शहिदों के नाम प्रज्वलित करण्यात आला. गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे भारत मातेच्या वीर पुत्र ज्यांनी देश सेवा करताना आपल्या प्राणाची आहुती दिली सीमेवर तैनात वीर जवान जे आपल्या परिवारापासून दूर आहेत त्याचे स्मरण म्हणून एक दिवा त्याच्या व त्याच्या परिवारांसाठी प्रज्वलित केला जातो यावेळी मोठ्या संख्येत डिफेन्स वेटरन्स आणि समाजसेवक व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी भारतमाता की जय आणि वंदेमातरमचा जयघोष करण्यात आला सर्वांनी एकसुरात राष्ट्रगीत बोलून वीर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर एकमेकांना मिठाई भरविण्यात आलीवीर शहिदांच्या परिवाराला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळूदे त्या माता,बहीणींना पण नमन ज्यांनी आपल्या रक्षणार्थ आपल्या मुलांना देश सेवेसाठी सीमेवर पाठवले आहे जे आता दिपावली सारख्या शुभदिनी परिवारासह घरी दिपावली साजरी करू शकत नाहीत! अशा विर जवानांनकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभाग व उपस्थित होते नेव्ही वेटरन्स कुमार शैलेन्द्र सिंह, एक्स सर्विस मैन वेटरन्स वेलफेअर एसोशियनचे अध्यक्ष नेव्ही वेटरन्स श्री. सुनिल पणीकर, नेव्ही वेटरन्स श्री. सुख मनप्रित सिंह, एअरफोर्स वेटरन्स श्री. मिलिंद गोडसे, आर्मी वेटरन्स श्री. जयदीप भोईर, एअरफोर्स वेटरन्स श्री. सुशांतो भट्टाचार्य, नेव्ही वेटरन्स श्री. जितेंद्र राऊळ, नेव्ही वेटरन्स श्री. अजय मिश्रा, नेव्ही वेटरन्स श्री. महेंद्र सिंह यादव, समाजसेवक मेघनाथ घरत, समाजसेवक श्री. प्रफुल्ल वाघहोले, श्री. शंभू सिंह, श्री. अमितेश यादव, श्री. तुषार मिश्रा, श्री. विशाल, श्री. विरेंद्र मिश्रा, पत्रकार श्री. सतिश वि. पाटील, श्री. मनिष वैती, श्री. तुषार पाटील, श्री. हेमंत मढवी हे उपस्थित होते