अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा झंझावात!
बुधवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
बाईक रॅली, पदयात्रा, मेळाव्यातून प्रचाराची रंगत वाढणार!
प्रतिनिधी भोसरी विधानसभा दि. ५ नोव्हेंबर २०२४ महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने बुधवारी (दि.६) चिखली येथे पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दुपारी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, बाईक रॅली मधून चिखलीमध्ये मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा झंझावात निर्माण करणार आहेत.
अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने
सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान चिखली गावामध्ये पदयात्रा होणार आहे.
त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे (उबाठा) उपनेते सचिन अहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून यासाठी सीजन बँक्वेट हॉल यमुनानगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली आहे .या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व आघाड्यांचे, सेलचे पदाधिकारी बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.