महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. – युवराज दाखले.
प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. ०७ नोव्हेंबर २०२४ ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे ही अत्यंत चुकीची बाब आहे.
ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने व वैयक्तिकरित्या तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास शिवशाही व्यापारी संघ, सकल मातंग समाज खपवून घेणार नाही. असा इशारा लोकसेवक युवराज दाखले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.