
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ नोव्हेंबर २०२४ शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश समन्वयक सकल मातंग समाज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड शहरांमध्ये साजरा करण्यात आला.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष डी पी खंडाळे, नानासाहेब कसबे यांच्या समवेत केक कापून व नंतर पुष्पगुच्छ देऊन युवराज दाखले यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी धनगर समाजाचे नेते गणेश खरात माजी अध्यक्ष रामदासजी कांबळे , राजू चव्हाण, अविनाशजी शिंदे अध्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटोळे, गणेश कलवले, शिवाजीराव साळवे, शिवाजीराव खडसे, व्यापारी संघ महिला आघाडी मोशी तालुका अध्यक्ष संगीताताई जाधव प्रदेश उपाध्यक्ष सीमा भालेराव, अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोले, सचिन अण्णा लिमकर, शुभम बिराजदार यांच्यासह शेकडो मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो समाज बांधवांनी व हितचिंतकांनी दाखले यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला.





