शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर कार्यकरणी जाहीर-युवराज दाखले
प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. ०२ डिसेंबर २०२४ शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजी खडसे यांच्या नेतृत्वाखाली शहराची कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक निगडी या ठिकाणी बैठक घेऊन जाहीर केली.
शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर कार्यकरणी पुढील प्रमाणे.
०१) कार्याध्यक्षपदी अमोल लोंढे ,
०२) महासचिवपदी सुरज कांबळे
०३) उपाध्यक्षपदी अनिकेत साळवे, अविनाश गायकवाड, सोहेल शेख, राज वाघमारे
०४) सचिवपदी सोहेल पठाण
०५) सहसचिव राहुल सावंत
०६) संघटकपदी मारूती काळे
०७) प्रसिद्धी प्रमुखपदी करण भालेराव
या नवनियुक्त पदाधिकार्यांची नियुक्ती आज जाहीर करून नियुक्ती पत्रक देऊन गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, डी पी खंडाळे व रामदास कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप, माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कळवले, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजी खडसे, महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सीमाताई भालेराव, मुख्य सचिव कल्पना मोरे(दाखले), शिवशाही बँड कलाकार आघाडी प्रदेशाध्यक्ष नंदु कारके आदी पदाधिकारी उपस्थित होते.