चाकण पोलीस स्टेशन कडुन सराईत मोटार सायकल चोरास अटक, चार मोटार सायकली जप्त..

प्रतिनिधी चाकण दि. ०८ मार्च २०२४ मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या सुचनांचे अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाबाबत तपास करीत असतांना डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ यांनी पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरटयांची माहिती काढुन कारवाई करण्यासाठी सुचना व र्मादर्शन केले होते. त्यानंतर दिनांक ०४ / ०३ / २०२४ रोजी चाकण पोलीसांना गोपनीय बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या बातमीचे आधारे इसम नामे ओमंकार अरविंद पांडे, वय २० वर्षे, रा चव्हाण नगर, तळवडे पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे मोटार सायकल चोरीचे गुन्हयांचे अनुषगाने कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने चाकण पोलीस स्टेशन, म्हाळुंगे पोलीस स्टेशन तसेच देहुरोड पोलीस स्टेशन हददीतुन मोटार सायकल चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली व चोरी केलेल्या खालील प्रमाणे मोटार सायकल काढुन दिल्या आहेत.
आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मोटार सायकली खालील प्रमाणे आहेत.
०१- मोटार सायकलचा प्रकार मोटार सायकल नंबर एम एच १४ एच झेड ६११९ हिरो कपंनीची एच एफ डिलक्स. ०ર- होंडा कपंनीची एक्स ब्लेड एम एच २८ बी जी ३७०९. ०३- हिरो कपंनीची स्प्लेन्डर एम एच १४ ई एस ६६१५. ०४- हिरो कपंनीची सी डी डिलक्स पोलीस स्टेशन व गुन्हा रजि. नंबर चाकण पोलीस स्टेशन गु र नं १५१ / २०२४ भादवी कलम ३७९ चाकण पोलीस स्टेशन गु र नं ७० / २०२४ भादवी कलम ३७९ देहुरोड पो स्टे गुर नं १०९ / २०२४ भादवी कलम ३७९ एम एच १२ एच डब्लु ०५३० म्हाळुंगे पो स्टे गुर नं १२३ / २०२४ भादवी कलम ३७९
वरील प्रमाणे आरोपी ओमंकार अरविंद पांडे वय २० वर्षे रा चव्हाण नगर, तळवडे पुणे याचेकडुन चाकण पोलीसांनी मोटार सायकली जप्त करून चाकण, म्हाळुंगे व देहुरोड पोलीस स्टेशन कडील मोटार सायकली चोरीच्या गुन्हयाची उकल केलेली आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. बी. एस. नरके तसेच तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, पोलीस उप निरीक्षक नामदेव तलवाडे, सफौ सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, मनोज साबळे, भैरोबा यादव, पोकॉ / रमेश कांबळे, संतोष फटांगरे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, सुनिल भागवत, मपोशि/ माधुरी कचाटे यांनी केलेली आहे.



