पैशांचे व्यव्हारातुन पेंटरचा खुन करणारे ०६ आरोपींना १२ तासात अटक वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २८ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिना दिवशी दि.२६/०१/२०२४ रोजी थेरगाव हॉस्पीटल मधुन फोन आला की, एका इसमास बेशुध्द् अवस्थेत दोन इसम हॉस्पीटल मध्ये सोडुन पळुन गेले असुन सदरचा इसम उपचारापुर्वीच मयत झाला असुन त्यास मारहाण झालेमुळे तो मरण पावला असुन त्याचा खुन झाला आहे. असा फोन आले नंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि. अनिरुध्द् सावर्डे यांनी थेरगाव हॉस्पीटल पुणे येथे दाखल होवुन घटनेची माहीती घेतली. त्यानंतर पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२ श्री. बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त श्री विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री विठ्ठल साळुंखे यांनी न्यु थेरगाव हॉस्पीटल येथे येवुन तपास पथकाच्या दोन टिम तयार करुन त्यांना मार्गदर्शन व सुचना देवुन आरोपी आणणेकामी रवाना केले.
मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी घटनेची गांभीर्य ओळखुन तपास पथकास तात्काळ आरोपी निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले. व मयत नामे भुवाल ऊर्फ मनोज
जगदीश मौर्या याची पत्नि लालमुनी मौर्या यांचे तक्रारीवरुन वाकड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ८४ / २०२४ भादविक ३६४,३०२,२०१,१४३, १४५, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच पोउपनि सचिन चव्हाण व पोउपनि अनिरुद्ध सावर्डे यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन तपास सुरु केला.
थेरगाव हॉस्पीटल येथील रुग्णांचे नातेवाईक व तेथे हजर असलेले स्थानिक नागरीक यांचेकडे चौकशी केले नंतर सदरचे रिक्षाचा नंबर एमएच १४ जीसी. ३१९० असा असलेचे समजले व त्यामध्ये दोन इसम होते अशी माहीती मिळाली व सदरचे रिक्षा ही इसम नामे दिनेश रामेश्वर मस्के वय २७ वर्षे रा. चिंचवड पुणे हा वापरत असलेचे
समजले त्यानंतर दिनेश मस्के याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.
त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की, आमचे मालक शुभम दिलीप वाल्हेकर रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे यांनी त्यांचेकडील इनोव्हा कार मधुन एका इसमास वाल्हेकरवाडी येथील साईडचे पत्राशेड मध्ये आणले होते. सदर इसम याने शुभम वाल्हेकर यांचेकडुन पेंटींगचे कामाकरीता घेतलेले पैसे परत देत नव्हता व त्यांचे काम देखील करीत नव्हता. याकारणावरुन शुभम वाल्हेकर यांचे सोबत असलेले कुणाल भरम व सौरभ वाघमारे यांनी सदरचे इसमाचे हात पाय काथ्याने व रिबीनने बांधले. त्यानंतर कुणाल वाल्हेकर याने
बांधलेला इसम नामे भुवाल ऊर्फ मनोज जगदीश मौर्या यास तु माझे पैसे दे नाहीतर तुला मारणार असे म्हणालेवर सदरचा इसम माझेकडे पैसे नाही असे म्हणाला. त्यामुळे शुभम याने चिडुन जावुन सागर जाधव, आकाश धापटे, कुणाल भरम, सौरभ वाघमारे, दिनेश मस्के यांचे सोबत त्यांचे हातातील पिव्हीसी पाईपने भुवाल ऊर्फ मनोज जगदीश मौर्या यास मारहाण करणेस सुरुवात केली. सदरचे मारहाणीत भुवाल ऊर्फ मनोज जगदीश मौर्या हा बेशुध्द् पडल्याने दिनेश मस्के व अक्षय पाटील असे दोघेजण मनोज मौर्या यास रिक्षामध्ये घालुन न्यु थेरगाव हॉस्पीटल थेरगाव पुणे येथे आणुन सोडुन पळुन गेले असे सांगीतले.
त्यानंतर सर्व आरोपींचा गोपनिय माहीतीचे आधारे व तांजीक तपासाद्वारे तपास करुन आरोपी नामे १) शुभम दिलीप वाल्हेकर वय २७ वर्षे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे २) सागर जगन जाधव वय २७ वर्षे रा. रहाटणी फाटा
पुणे ३) कुणाल सुरेश भरम वय २३ वर्षे रा. वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ४) सौरभ राजेंद्र वाघमारे वय २५ वर्षे रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे ५) अक्षय लक्ष्मण पाटील वय २३ वर्षे रा. बिजलीनगर चिंचवड पुणे ६) दिनेश रामेश्वर मस्के वय २७ वर्षे रा. चिंचवड पुणे यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांना गुन्हयाचेकामी अटक केली आहे. आरोपींना मे. कोर्टात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची पुढील ०७ दिवसांची
पोलीस कोठडी मंजुर केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सूरू असुन तो सपोनि. पवार वाकड पो.स्टे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर साो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि. सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुध्द् सावर्डे, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोहवा. दिपक
साबळे, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. रामचंद्र तळपे, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे, पोशि. सागर पंडीत (परि ०२ कार्यालय) यांनी
मिळुन केली आहे.



