
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०६ डिसेंबर २०२४ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने जेष्ठ मार्गदर्शक हेमंत (काका) हरहरे यांच्या हस्ते “भीमसृष्टी” स्मारक पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सवंदडेसर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, मुख्यसचिव कल्पना मोरे (दाखले), महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सीमाताई भालेराव, मावळ लोकसभा अध्यक्षा भारतीताई चांदणे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती माजी अध्यक्ष डी. पी. खंडाळे, रामदासजी कांबळे, राजू चव्हाण उद्योजक अनिल गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.