आंदोलनआर्थिकमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

“मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेतील उर्वरित कामासंदर्भात बॅंक ऑफ महाराष्ट्र दिलेल्या इशार्‍यानंतर उर्वरित कामे लवकर पूर्ण करून घेण्याची बॅंकेची ग्वाही..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ डिसेंबर २०२४ भिमशाही युवा संघटनेच्या वतीने काल दि. १० डिसेंबर २०२४ रोजी. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मासुळकर येथील. बँक मॅनेजर यांना संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांनचे के. वाय. सी. करून घेण्यात यावेत. तसेच सर्व महीलाचे “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेचे कामे पूर्ण करावीत. या मागणीसाठी भिमशाही युवा संघटनेच्या वतीने आंदोलनांचा इशारा देण्यात आला होता. या वेळी पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरीष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार साहेब व बँक ऑफ महाराष्ट्र मासुळकर शाखेचे बँक मॅनेजर बारस्कर साहेब यांच्याशी वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेतील सर्व महिलांना बँकेकडून सहकार्य केले जाईल. असे बँक मॅनेजर यांनी सांगितले. व पिंपरी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कुंभार साहेब यांनी देखील सर्व महिलांना बँकेकडून सहकार्य करावे. असे बँक मॅनेजर यांना सुचित करण्यात आले.
या वेळी भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाळके व भिमशाही युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!