उत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

अपना वतन संघटनेला ” मानवाधिकार विशेषकार्य ” पुरस्कार..

प्रतिनिधी पूणे दि. ११ डिसेंबर २०२४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थांच्या वतीने काल दि. १० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ” अपना वतन ” सामाजिक संघटनेला विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार देण्यात आला. यावेळी अपना वतन संघटनेच्या सर्व टीमला जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय पुणे मा. श्री. महेंद्र महाजन, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे मा. पाटील सर, ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर, घटनातज्ञ उल्हास बापट, प्राचार्य सुधाकरराव जाधवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व संविधान देऊन गौरविण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, संघटक तौफिक पठाण, रियाज शेख, जमील शेख, सादिक शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिद्दीकभाई शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, या पुरस्काराने आमची ऊर्जा वाढली असून अधिक जोमाने सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आमचा सन्मान केल्याबद्दल मानवी हक्क संरक्षण समिती चे अध्यक्ष विकास कुचेकर यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!