सार्वजनिक पुजा समिती भांडूप गाव ७५ वा अमृत दिप महोत्सव..
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. १४ डिसेंबर २०२४ यंदा सार्वजनिक पुजा समितीचे ७५ वा अमृत दिप महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सार्वजनिक पुजा समिती अध्यक्ष परशुराम कोपरकर, सरचिटणीस महेश पाटील, खजिनदार उषा काकडे याच्या सह सर्व सार्वजनिक पुजा समितीचे आजीमाजी सदस्य व कार्यकर्ते यांनी अथकपरिश्रमाने भव्य भरीव कामगिरी बजावली यंदा सार्वजनिक पुजा समितीच्या ७५ व्या वर्षा निमित्त भांडूप गावातील सर्व वयोवृद्ध महीलांना, मातांना घरोघरी जाऊन साडी देवून सन्मान व सत्कार करण्यात आला व त्याचे आशिर्वाद ही घेण्यात आले. मंडळाचे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक असे कार्यक्रम राबविण्यात येतात, शाळेतील दत्तक विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, मोफत आरोग्य शिबीर, व्यसनमुक्त शिबीर, घरगुती गणपती सजावट स्पर्धा, गणेश विसर्जन सोहळा, शिष्यवृत्ती, पाचवी ते दहावी दत्तक विद्यार्थी, गोरगरीबांना वैद्यकीय मदत तसेच अनेक कलावंतांना सन्मानित करणे, तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमात ग्रुप डान्स, सोलो डान्स, वेशभूषा स्पर्धा, किल्ले स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला व ज्ञानवर्धक स्पर्धा अशा अनेक स्पर्धेचे आयोजन व त्यांना रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी महोत्सवात अनेक मान्यवरांकडून हजेरी लावण्यात आली, मा. खासदार संजय दि.पाटील, मा.आमदार सुनील राऊत, मा. खासदार मनोज कोटक, खासदार संजय राऊत, मा. नगरसेवक सुरेशभाई कोपरकर तसेच मा. परिक्षक व जेष्ठ पत्रकार श्री. सतिश वि.पाटील यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. यावेळी सर्व दानशूर देणगीदार व गावकरी, सभासद, प्रेक्षक, कलाकार यांचे मंडळाच्या वतिने आभारी मानण्यात आले.