महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माणिकराव भागवत पौळ यांची नियुक्ती जाहीर..
प्रतिनिधी मुंबई दि. २० डिसेंबर २०२४ शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माणिकराव पौळ यांची नियुक्ती संस्थापक /अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त वरिष्ठ उपाध्यक्षपदी माणिकराव पौळ यांनी व्यापारी वर्ग सर्वसामान्य नागरिक माता-भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची विनंती व सूचना दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शक डी पी खंडाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, राजु चव्हाण, अजय कसबे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.