आनंदनगर मधील रेल्वे बाधित झोपडपट्टीचे प्रथम पुनर्वसन करा मगच झोपड्या खालीकरा-मारुती भापकर
पुणे विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे चिंचवड आनंद नगर, रेल्वे बाधित झोपडपट्टीचे पुनर्वसनाबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाकडे करणार पाठपुरावा..
माजी नगरसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद क्षीरसागर, नेताजी शिंदे, ज्योती शिंदे, मारुती कानडी, संजय कांबळे, आम्रपाली
आवाड, हिराबाई ओव्हाळ, छाया भोसले यांनी निवेदनातून केली मागणी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ डिसेंबर २०२४ रेल्वे प्रशासनाने अन्यायकारक पणे ४० वर्षांपासून आनंदनगर येथे राहणाऱ्या झोपडपटटीधारकांना रेल्वे अधिकार्यांनी नोटीस दाखवून ०३ दिवसांची बेदखल नोटीस बजावली आहे. आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्यासाठी रेल्वे अधिकारी, पुणे यांनी सर्व आनंदनगर मधील रहिवाश्यांना ताबडतोब घरे मोकळी करण्यासाठी आदेश दिले आहेत. यासंर्भात नोटीस देखील बजावलेल्या आहेत. परंतू जोपर्यंत महानगरपालिका किंवा राज्य सरकार रेल्वे बाधित झोपडपट्टी रहिवाशांचे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत झोपडपट्टी हटवण्याचा मुद्दा पुढे ढकलण्याची विनंती मा. विभागीय आयुक्तांना करण्यात आली आहे. यावेळी भापकर म्हणाले की आपल्या आयोगाकडून या विषयाकडे लक्ष देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. संबधित तक्रार अर्जावर त्वरित कार्यवाही करून प्रभावित व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. अशी मागनी निवेदनातून मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे केलेली आहे.
यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद क्षीरसागर, नेताजी शिंदे, ज्योती शिंदे, मारुती कानडी, संजय कांबळे, आम्रपाली आवाड, हिराबाई ओव्हाळ, छाया भोसले आदि उपस्थित होते.