कलामनोरंजनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

संतोष आगटे आयोजित “सुगम संगीत संध्या “बाल कलाकारांनी प्रेक्षकांची जिंकली मने!

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. ०९ सप्टेंबर २०२५ मुंबई महापालिकेतील मुलुंड येथे सेवा राम लालवानी शाळेमध्ये शिक्षण घेणारी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कुमारी अनुश्री जाधव हिचा सुंदर आवाज आणि गाण्याकडे संगीत विषयाकडे असलेली जास्तीची ओढ लक्षात घेऊन तिचा गाण्याचा कार्यक्रम “सुगम संगीत संध्या” संतोष आगटे यांनी आयोजित केला होता. यामध्ये भावगीत, भक्तिगीत, लावणी आणि गझलचा देखिल समावेश होता. या कार्यक्रमाची संकल्पना श्री संतोष आगटे यांची होती. या कार्यक्रमात मेधा दिवेकर (कथक नृत्य आर्टिस्ट मुलुंड) यांच्या ग्रूप मधिल विद्यार्थिनींनी कथक नृत्य खूप सुंदर रित्या सादर केले आणि रसिकांची दादही मिळवली. याप्रसंगी संगीत क्षेत्रातले व सामाजिक कार्यातील अनेक स्थानिक मान्यवर, रसिक श्रोते आणि पत्रकार आवर्जून उपस्थित होते. त्यांनी बालकलाकार अनुश्रीचे भरभरून कौतुक करून बक्षिसेही दिली. यावेळी कीबोर्डवर पाटील व शिधये होते, तबला संतोष आगटे व ढोलक ढोलकी विनय चौगुले यांची समर्पक अशी संगीत साथ लाभली. कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन संतोष आगटे (निदेशक मुंबई महापालिका शिक्षण विभाग) व सहसंयोजक विनय चौगुले (निदेशक संगीत विभाग मुंबई महानगरपालिका) यांचे होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती. गौरी आठल्ये यांचे होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. प्रजापती मॅडम यांचे पण अनमोल सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांचे यावेळी सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी सर्व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!