अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी- शिवाजीराव खडसे
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ जानेवारी २०२५ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माता भगिनींचे रक्षण करून प्रत्येक भगिनींना शिक्षणासाठी कायम मदत करण्याचा संकल्प शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले यांनी केला.
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, निगडी विभाग अध्यक्ष बापूसाहेब डंबरे आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते