प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ जानेवारी २०२५ वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्र साळवे, महिला शहर उपाध्यक्ष मंदाकिनीताई गायकवाड, शहर सचिव अशोक खोपे, शहर शहर संघटक विजय गायकवाड, माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड, काळेवाडी शाखा अध्यक्ष शिवाजी खडसे, आर जी गायकवाड, डॉ. शंकर कसबे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.