आगरी सेनेकडून सिध्दगड बलिदान दिनाच्या पूर्व संध्येला अंबरनाथ मध्ये क्रांती ज्योत मशाल रॅलीचे आयोजन संपन्न..
प्रतिनिधी सतिश पाटील मुलुंड मूंबई दि. ०३ जानेवारी २०२५ आगरी सेना , क्रांतीवीर वामन काळू भोईर व नाभिक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पंधरा वर्षे पासून अंबरनाथ मध्ये स्वतंत्र वीर हुतात्मा हिराजी पाटील व भाई कोतवाल यांच्या स्मरणार्थ सिद्धगड बलिदान दिनाच्या पूर्व संध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबरनाथ ते सिध्दगड मुरबाड अशी क्रांती ज्योत मशाल रॉली काढण्यात येत असते.
या दोन्ही भारतमातेच्या सुपुत्रांना ०२ जानेवारी १९४२ रोजी पहाटे ०६ वाजून १० मिनिटांनी इंग्रजांनी गोळ्या झाडल्या व या स्वतंत्र वीरांना हुतात्म प्राप्त झाले. त्यांच्या या थोर कार्याची स्मृती समाजात जागृत ठेवण्यासाठी अंबरनाथ मध्ये क्रांती ज्योत मशाल रॅलीचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला सर्व स्थरांतून उत्तम प्रतिसाद व सहकार्य मिळाले. भारत मातेच्या या विर सुपुत्रांच्या बलिदानातून देशाला गुलामीच्या जोखडातून मुक्ती देण्याचे महान कार्य या वीरांनी केले. आपल्या अंबरनाथ, कर्जत, मुरबाड तालुक्यातील अनेक भूमिगत क्रांतीकारक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रचंड हलाखीचे दिवस काढत आपल्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून देशासाठी लढण पसंत केल त्या या परिसरातील प्रेरणादाई असलेल्या सर्व थोर विंराना मनापासून विनम्र अभिवादन.
याप्रसंगी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आगरी सेनेचे संपर्क प्रमुख मनोज साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठाणकर, सरचिटणीस मंगेश शेलार, संपर्क प्रमुख संजय फुलोरे, तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत भोईर, सरचिटणीस दीपक शेलार, जयहरी भोईर,जयेंद्र खुणे, शत्रुघ्न भोईर, तसेच मा. नगरसेवक ज्योत्स्ना भोईर, तुळशीराम चौधरी, रवींद्र पाटील, आगरी सेनेचे पदाधिकारी, सदस्य, अंबरनाथ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अंबरनाथ येथील आय टी आय ला वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यात आल्याने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व बालाजी किणीकर यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. तसेच हुतात्मा हिराजी पाटील व भाई कोतवाल यांचा इतिहास देखील शालेय पाठ्य पुस्तकात समावेश करण्याच्यादृष्टीने शिक्षक आमदारांनी पाठपुरावा करून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
अंबरनाथ येथील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर क्रांती ज्योत मशाल रॅली सर्व उपस्थित पाहुणे, पदाधिकारी, कार्यकर्ते पत्रकार: श्री.सतिश वि.पाटील व समाज बांधव यांच्या सह छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अंबरनाथ शहरातून बदलापूर मार्गे सिध्दगड मुरबाड कडे रवाना झाली. रॅली मार्गात वाळीवली, एरंजाड, मुळगाव, लव्हाळी येथील मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी देशभक्ती वर आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांती ज्योत मशालीचे स्वागत करत हुतात्मा हिराजी पाटील व भाई कोतवाल यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.