
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ जानेवारी २०२५ दोनदिवसांनपूर्वी म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिनेश शंकर कुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बालाजी नगर येथील बूद्ध विहारात त्रिसरण पंचशिल ग्रहण करून तेथील वाचनालयाला सर्व महामानवांचे आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्यात आली. सोबत बालाजीनगर मधील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
तसेच सर्व महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. अशा विविध समाज उपयोगी व शालेय विद्यार्थांना गरजेच्या वस्तूंचे पाटप करण्यात आले. तसेच वाढदिवसाचे औचित्यसाधून नूतनवर्षाच्या दिनदर्शिकेचे सामान्य नागरिकांना वाटप करण्यात आले.
सायंकाळी मित्र, व स्थानिकांचे समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बालाजीनगर व आसपासचे असख्य नागरीक उपस्थित होते.
या वेळी दिनेश कुऱ्हाडे यांनी वाढदिवसानिमित्त समाजकार्याच्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याचा, संकल्प केला.


