
प्रतिनिधि पिंपरी चिंचवड मणिपूर येथील महिलांची नग्न धिंड काढली व बलात्कार करून हत्या केली अशा महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी पिंपरी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आज दिनांक २४ जूलै २०२३ रोजी दुपारी १२ वा. भिमशाही युवा संघटना, बहुजन एकता आंदोलन, पॅंथर युवा मोर्चा, व इतर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांनी मणिपूर मधील महिलांनवर अत्याचार करणाऱ्यां नराधमांना फाशी देण्यात यावी. अशी मागणी केली. तसेच देशातील जातीयवादी भाजप सरकार विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. व मणिपूर मधील महिलांना संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी शिवशंकर उबाळे सुरज शिखरे, अरुण मैराळे, यांनी या वेळी केली.
बहुजन एकता आंदोलनाचे नेते राजेंद्र पवार, यांनी केंद्र सरकार वर जोरदार निशाना साधला देशातील महिलांचे संरक्षण करता येत नसेल तर पंतप्रधान व गृहमंत्री आणि मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
कोणत्याही राज्यात महिलांवर असे अन्याय अत्याचार घडले तर देशभर आंदोलन छेडले जातील असा इशारा देण्यात आला. प्रदीप टोपे, श्रीकृष्ण वाघ, ज्येष्ठ नेते महेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते अशोक वानखेडे, नागेश सदावर्ते, राहुल रोकडे, राहुल भोसले, गौतम सूर्यवंशी, रावसाहेब कोळी, अरुणा पाटील, मेघा नितनवरे, संगीता कांबळे, रेश्मा गायकवाड, सोनाली पंचि, पॅंथर युवा मोर्चा चे रामभाऊ ठोके, शीलाताई मुळे, ऋतुजा पौळ, मयूर कदम, यांनी देखील सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
तसेच महाविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोलोमोनराज भंडारे, महाविकास समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कमरुनिसा शेख, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष जावेद जागीरदार, नजीर वाघू, फरीद शेख, राजु मारीमुनतु, संजना मोरे, लक्ष्मी जोशी, फमीदा शेख, अदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असे आयोजक
शिवशंकर उबाळे, राजेंद्र पवार, रामभाऊ ठोके, यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.




