
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जानेवारी २०२५ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नेहरूनगर प्रभागाचे कार्यक्षम नगरसेवक राहुल भोसले, व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जेष्ठ नेते देवेंद्र तायडे, भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे तसेच युवा नेते कमलेश वाळके यांनी नेहरूनगर येथील नाना नानी पार्क येथे वर्धापन दिनाच्या कार्यक्रम स्थळी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी भिमशाही युवा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक राहुल भोसले, ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते राजन नायर, तसेच कमलेश वाळके, एम. आय. एम.च्या नेत्या रोहिनाज शेख, भीमशक्ती संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरज गायकवाड, बौद्धाचार्य उत्तम जोगदंड. राहुल भोसले युवा मंचचे किशोर गवळी, संजय जाधव, साहेबराव जगताप, ईनकर मामा, पॅंथर युवा मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ ठोके, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष शांताराम खुडे, समता विकास संघ अध्यक्ष माऊली बोराटे, सामाजिक कार्यकर्ते स्नेहलताताई पाटोळे, मंदाताई मुसळे, गवळणताई शिखरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार भीमशाही युवा संघटना कार्याध्यक्ष नितीन कसबे यांनी मानले, कार्यक्रमाचे आयोजन भिमशाही युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.