“राष्ट्रसंत गाडगेबाबा” यांना मूकनायकच्या वर्धापन दिन संयोजक टिमच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २१ डिसेंबर २०२३ काल दि. २० डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी पिंपरी याठिकाणी अभिवादन करण्याकरिता मूकनायक न्युज पेपर वर्धापन दिन सोहळ्याच्या संयोजक टिमच्या वतिने त्रिवार अभिवादन करण्यात आले. यावेळी मूकनायकचे संपादक तूषारजी गायकवाड यांनी संत गाडगे महाराज यांचे खरे नाव सांगीतले ते बोलले संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा असे तूषार गायकवाड यांनी सांगीतले
यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कमीटीचे कार्याध्यक्ष मा. देवेंद्रजी तायडे यांनी आपले विचार मांडले ते बोलले “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी लोकांना दिली. असे देवेंद्रजी तायडे यांनी बोलले
याच प्रमाणे राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. राजन नायर यांनी देखील आपले विचार मांडले यावेळी ते बोलले माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. संत गाडगेबाबा यांच्या पेहरावासंदर्भात ते बोलले डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.” या वेळी मूकनायक पेपरचे संपादक तूषार गायकवाड, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कमीटीचे कार्याध्यक्ष मा. देवेंद्रजी तायडे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. राजन नायर, मा. सूधिरजी जावळे, मा. राजेंद्रजी पवार संस्थापक अध्यक्ष बहुजन एकता अंदोलन महाराष्ट्र राज्य, मा. राजकूमार गायकवाड, मा. प्रा. यूवराजजी भास्कर (तिकटे) मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे व धर्मराज फडतरे हे उपस्थित होते.




