आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
पत्रकार बांधवांना महामेट्रोचा प्रवास मोफत करून पास द्या- युवराज दाखले.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पुणे दि. २९ मे २०२५ मिडिया प्रतिनिधी, पत्रकार बांधवांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी वृत्तांकन करण्या साठी वारंवार प्रवास करावा लागत आहे त्यामध्ये त्यांचा आर्थिक खर्च व वेळ खुप वाया जात आहे.
दरम्यान रेल्वे प्रवासात, पी. एम. पी. एल. प्रवास तसेच राज्य परिवहन एस. टी. सेवेत मोफत प्रवास पत्रकार बांधवांना मिळत आहे, तरी आपण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोने प्रवास करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना मोफत पास देण्यात यावा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी महामेट्रोच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.



