तीन पोलिस निरीक्षक, तसेच चार सहायक निरीक्षकांच्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ जानेवारी २०२५ पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत तीन पोलिस निरीक्षक, तसेच चार सहायक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी दि. २८ जानेवारी २०२५ याबाबतचे आदेश देण्यात आले होते.
देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. व त्यांचे जागी पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांची काळेवाडी पोलिस ठाणे येथून देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली असल्याचे समजते.
पोलिस निरीक्षक सचिन शिर्के यांची भोसरी पोलिस ठाणे येथून काळेवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. त्याचप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे (पिंपरी पोलिस ठाणे ते बावधन पोलिस ठाणे), राकेश भामरे (दिघी पोलिस ठाणे ते विशेष शाखा), विजयकुमार धुमाळ (बावधन पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), अंबरीश देशमुख (निगडी पोलिस ठाणे ते बावधन पोलिस ठाणे) यांची बदली झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेले पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे नेमणूक करण्यात आली आहे.



