आंदोलनभोसरी विधानसभामहाराष्ट्रविशेषशहर

उद्योजकांना मूलभूत सुविधा द्या अन्यथा पालिकेवर चक्काजाम आंदोलन-अभय भोर

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३१ जानेवारी २०२५ उद्योजकांना मूलभूत सुविधा द्या अन्यथा पालिकेवर चक्काजाम आंदोलन करणार इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांचा इशारा. भोसरी एमआयडीसी येथे आज फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत क प्रभाग अ प्रभाग स्पाईन रोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते . एमआयडीसी परिसरात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आज अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक संपन्न झाली. बैठकीत एमआयडीसीतील विविध प्रश्नांवर चर्चा झाली अनेक उद्योजकांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या या ठिकाणी मांडल्या. यावेळी एमआयडीसीतील कचरा समस्या वाहतूक समस्या ड्रेनेज सुविधा रोड लाईट ई.टी.पी प्लांट चोऱ्या आणि अतिक्रमणे चौक विस्तारीकरण याबाबत चर्चा करण्यात आल्या यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी महानगरपालिकेला येत्या दहा दिवसात उद्योजकांच्या प्रश्नांवर उत्तर नाही मिळाले तर महानगरपालिकेत भव्य आंदोलन घेणार असल्याचा इशारा दिला एमआयडीसी परिसराकडे शासनाच्या सर्वच विभागांचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून फक्त कर रूपी पैसा जमा करण्याचे काम चालू आहे. उद्योजकांच्या समस्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याच्या दिसून येत आहे. उद्योजकांना अनेक सोयी सुविधा या पैसे देऊन विकत घ्याव्या लागतात आणि परिसराला अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले असून या ठिकाणीउद्यान विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरात लाईटच्या खांबांवर आलेल्या फांद्यामुळे उजेड पडत नाही कित्येकदा सांगून देखील उद्यान विभागाचे दुर्लक्ष आहे या ठिकाणांच्या अनेक चौकांना लोकांनी वेगवेगळी नावे दिली आहेत याच्याकडे प्रभाग अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात आले अनेक चौकांमध्ये विस्तारीकरण करणे गरजेचे असून उद्योजकांना वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते या ठिकाणी बंद पडलेल्या टपऱ्या बंद पडलेली वाहने तसेच रस्त्यावर अनधिकृत पणे अनेक गैरव्यवहार भंगारची दुकाने सूरू आहेत. त्यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली असल्याचे उद्योजकांनी सांगितले. खूप मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग टिकवायचे असतील तर महानगरपालिका एमआयडीसी पोलीस विभाग या सर्वच विभागांनी पुढाकार घेऊन उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात असे वक्तव्य केले या ठिकाणी क प्रभाग अधिकारी कांबळे साहेब यांनी महानगरपालिके तर्फे त्वरित याबाबत पावले उचलून लवकरच बैठक लावण्यात येईल आणि या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून यावरील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी भोसरी स्पाईन रोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किरण पाठारे साहेब यांनी परिसरामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केले आणि विविध उपायोजनांबाबत चर्चा केली तसेच उद्योजकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास जाणवल्यास त्वरित पोलीस स्टेशनला सांगितल्यास त्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा आश्वासन दिले या ठिकाणी एमआयडीसीतील अनेक प्लॉट धारक मॅन्युफॅक्चरर कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते अनेक उद्योजकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!