महीलेची छेड काढणाऱ्यास हिंजवडी पोलीसांनी केली अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ ऑक्टोंबर २०२३ साधारण महिन्यांभरा पूर्वी दि. ३०/०८/२०२३ रोजी १९:३० वा. चे सुमारास एक महीला या उत्सव होम सोसायटी शेजारी वेलनेस मेडीकल समोरील रोडवर बावधन पुणे येथे फळे आणण्यासाठी पायी गेल्या
असताना एक काळया रंगाची स्कुटर वरील लाईनींगचा टी शर्ट घातलेला गोल चेहऱ्याचा उंचीने कमी असलेला इसमाने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करून प्रथम उत्सव होमच्या समोर अडवुन गाडीवर बसण्यास विचारणा करून पुन्हा सुर्यदत्ता कॉलेज समोर थांबवून फिर्यादी यांची इच्छा नसताना “कम अँड सिट” असे इंग्रजीत बोलून फिर्यादी यांनी त्याचे बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत जात असताना पुन्हा पाठलाग करीत पाठीमागुन स्कुटर वर येऊन अचानक जवळ येऊन फिर्यादी यांनी तोंड वळवले असताना गाडीवरूनच फिर्यादी यांची छातीस स्पर्श केला.
त्यामुळे फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १०६५/२०२३, भा.द.वि. कलम ३५४, ३५४ (ड), ३४१,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर असल्याने या गुन्ह्याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली होती. मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयूक्त परि २ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या होत्या.
डॉ. विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सागर काटे तसेच स.पो.नि. राम गोमारे यांनी सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास चालु करून तपास पथकातील अंमलदार यांना सुचना देऊन बावधन परिसरातील एकुण ८७ सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशईत वाहन टीव्हीएस स्कुटी पेप मोपेड हे निष्पन्न केले. परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हता,
त्यामुळे महीनाभरापासुन बावधन परिसरात वेशांतर करुन ट्रॅप लाऊन संशईत स्कुटी पेप वाहनधारकांवर लक्ष ठेऊन केलेल्या तपासामध्ये आरोपी नामे विलास राम गवळी, वय २८, रा. करंजावणे यांची रूम, कानिफनाथ मंदीरासमोर, बावधन, पुणे मुळ गाव रा. मु.पो. नवगाव, ता. पैठण, नवगाव, औरंगाबाद यास ताब्यात घेऊन त्याचेकडे कौशल्याने तपास करून त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दि. १६/१०/२०२३ रोजी २०:३० वा. दाखल गुन्ह्यात अटक करून उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि. २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, अरूण नरळे, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, नरेंद्र बलसाने, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडित यांनी केली आहे.



